अज्ञात टोळीने एका इसमास लाखो रुपयाला लुटले...
६ जणांच्या अज्ञात टोळीने एका इसमास लाखो रुपयाला लुटले...

पनवेल / दि. २८ ( संजय कदम  ) : पनवेल तालुक्यातील मुंबई - पुणे एक्स्प्रेस हायवेवर भाताण बोगद्याच्या अगोदर ६ जणांच्या अज्ञात टोळीने एका इसमास  लाखो रुपयाला लुटल्याची घटना घडली आहे .
                   आजिनाथ राख ( वय ३७ ) हे पहाटेच्या सुमारास त्यांच्या ताब्यात असलेल्या मारुती सुझुकी झेन एस्टिलो गाडी क्रमांक एम एच ४३ ए एल ३०५५ या   गाडीतून ठाणे बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना अचानक पणे पनवेल जवळील कि. मी. नंबर ११. ०० या ठिकाणी त्यांच्या मागे आलेल्या एर्टिगा गाडीतील अनोळखी सहा इसमांनी त्यांच्या गाडीला ठोकर मारल्याचा बहाणा करून त्यांची गाडी जबरदस्तीने थांबवून त्यांना मारहाण करून खालापूर फूड मॉल येथे जबरदस्तीने घेऊन जाऊन त्यांच्या गाडीत असलेली  १,९७००० /- रुपयांची रोख रक्कम व ओपो कंपनीचा मोबाईल फोन व इतर ऐवज असा मिळून जवळपास २,१७,००० /- रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने चोरी करून त्यांची गाडी तेथेच सोडून ते पसार झाल्याने या बाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments