पनवेल तालुका विधी सेवा समिती व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृती रॅली व मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न...
मतदार जागृती रॅली व मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न...

पनवेल / वर्ताहर - : तालुका विधी सेवा समिती, पनवेल व तहसील कार्यालय, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने  National Voters Day २०२३ निमित्त मतदान जागृती रॅली व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता पनवेल न्यायालय येथून रॅलीस सुरुवात वडणे ( अध्यक्ष- तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश, पनवेल) यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली आणि तहसीलदार कार्यालय, पनवेल येथे सांगता झाली. 
या रॅलीमध्ये सी.के.ठाकूर महाविद्यालय, पनवेल, येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मतदार राजा जागा हो... लोकशाहीचा धागा हो, यासारख्या लोकशाहीच्या सक्षमीकरणांमध्ये मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.९:३० वाजता तहसीलदार कार्यालय,पनवेल येथेल मार्गदर्शन कार्यक्रम सुरु झाला. 
या कार्यक्रमात तृतीयपंथीय, दिव्यांग बांधव, सेक्स वर्कर्स आणि नव मतदार  यांना मतदान कार्ड मान्यवरांच्या हस्ते  वितरित करण्यात आले. मतदानाचा हक्क हा लोकशाहीच्या बळकटीकरणाचा अविभाज्य भाग आहे. अशा आशयाचं मार्गदर्शन वडणे यानी केले. ‘Nothing Like Voting, I Vote for Sure’ हि 2023 च्या राष्ट्रीय मतदार दिनाची थीम आहे. तिचं महत्त्व आपल्या मनोगतातून विजय तळेकर (तहसीलदार पनवेल) यांनी सांगितले. 
भाकरे ( तदर्थ जिल्हा न्यायाधीश ) यांनी आपल्या मनोगतातून मतदारांना संबोधित करून मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास  इंदलकर ( सह दिवाणी न्यायाधीश ) आणि सोनवलकर ( चौथे सह दिवाणी न्यायाधीश ) विचार पिठावरती मान्यवर म्हणून उपस्थित होते. 

         या कार्यक्रमास बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. संदीप जगे, सचिव- ॲड. प्रल्हाद खोपकर, खजिनदार - ॲड. धनराज तोकडे, ऑडिटर- ॲड. विशाल मुंडकर, कार्यकारीणी सदस्य ॲड. छाया म्हात्रे, कार्यकारी सदस्य ॲड. अमित पाटील, कार्यकारी सदस्य- भूषण म्हात्रे, ॲड. राकेश म्हात्रे, ॲड. प्रणिता करे, ॲड. मनीषा गायकर आणि P.L.V. शैलेश कोंडसकर नायब तहसीलदार नाईक , शेलार, लचके आदी उपस्थित होते.
Comments