राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सखाराम बाईंडर या नाटकाने पटकाविला द्वितीय क्रमांक...
पनवेल / प्रतिनिधी :-
नुकत्याच महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा 2023 च्या स्पर्धा पार पडल्या, यामध्ये अनेक प्रसिद्ध नाटकांनी सहभाग घेऊन आपल्या नाटकाचे सादरीकरण केले.
यामधील पनवेल परिसरातील कलाकारांनी साकारलेल्या भूमिकेचं नाटक दिग्दर्शक बुद्ध दास कदम , विजय तेंडुलकर लिखित, रामदास शेवाळे प्रतिष्ठान तर्फे सादर केलेल्या "सखाराम बाईडर " या नाटकाने दुसरा क्रमांक पटकावून आपल्या नाटकाचा महाराष्ट्रात मानाचा तुरा रोवला आहे. रंगकाम चारुदत्त वैद्य, प्रकाश योजना संजय लोंडणकर, संगीत अक्षय जाधव, वेशभूषा कर्लिंदर शेख , रंगभूषा उदयराज तांगडी, नेपथ्यनिर्मित निर्माण उल्हास सुर्वे आणि मंडळी, रंगमंच व्यवस्था परेश मालवणकर, गौरव सातपुते, प्रवीण कुडार, शिरीष खरात, दत्ता बनकर, हेमंत गांगुर्डे, तसेच नाटकातील समीर पेणकर, दिपाली जाधव, शशिकांत सुतार, रोहित मोरे, विद्याधर नामपल्ली, कलाकारांनी शाळेतील प्रांगणात प्रयोगाचा सराव करून मोठ्या ताकतीने स्पर्धेत नाटक उतरवलं होतं, सखाराम बाईंडर ला स्पर्धेमध्ये मिळालेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून सामाजिक कार्यकर्ते रामदास शेवाळे कलाकारांच्या पाठीशी उभे राहुन त्यांना मोठा आधार देत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
या पार पडलेल्या महाराष्ट्र नाट्य स्पर्धेमध्ये "फक्त एकदा मागे वळून बघ" या नाटकाला महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक मिळाला. सखाराम बाईंडर नाटकाच्या कलाकारांच्या पाठीशी सामाजिक कार्यकर्ते रामदास शेवाळे खंबीरपणे उभा राहिले त्या बद्दल कलाकारांनी त्यांचे आभार मानले.