विद्यार्थी वाहकांचे रस्ता सुरक्षा अभियान ;रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, आरोग्य मार्गदर्शन, सुरक्षित वाहतूक कार्यशाळा संपन्न....


पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेच्या वतीने आयोजन

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल /प्रतिनिधी:- पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेने रस्ता सुरक्षा अभियानामध्ये सहभाग घेतला आहे. संस्थेच्या वतीने रविवारी  15 जानेवारी रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवीन पनवेल सेक्टर 5 येथील वृंदावन बाबा समाधी मंदिर सभागृहात हा सप्ताह संपन्न झाला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर सुरक्षा सप्ताह रॅलीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.

रस्त्यावरील अपघाताची संख्या कमी होऊन त्यामध्ये मृत्यू व जखमींचे होण्याच्या घटना घडू नयेत यासाठी सरकारच्या वतीने दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान आयोजित केले जाते. कोरोना वैश्विक संकटानंतर मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि प्रबोधन करणारे हे अभियान सुरू झाले आहे. याकरता पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेने सालाबाद प्रमाणे यंदा सुद्धा पुढाकार घेतला. नवीन पनवेल येथील वृंदावन बाबा समाधी मंदिर सभागृहामध्ये सकाळी 9 ते 2 या कालावधीमध्ये कच्छ युवक संघ यांच्या मदतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्कूल व्हॅन चालक त्याचबरोबर नागरिकांनी या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थी वाहकांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्म वाटप करण्यात आले. नायर सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटल व नवदृष्टी सेवा संस्था यांच्या मदतीने हे शिबिर घेण्यात आले. डॉ मालविका मिरज यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले .  
कार्यक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे, कामगार नेते प्रकाश म्हात्रे, पालक प्रतिनिधी विजया कदम आणि ऍड संदीप वाघ उपस्थित होते. 
सकाळी नवीन पनवेल येथे रस्ता सुरक्षितता जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग हुमणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पनवेल विद्यार्थी वाहक संस्था स्वयंशिस्त पाळणारी संघटना आहे. राज्याला आदर्श घालून देणारे काम या संस्थेकडून केले जात असल्याचे गौरोदगार  आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. कोरोनामध्ये अनेकांना मोठे नुकसान सहन. ते आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले त्यामध्ये स्कूल व्हॅन चालकांचाही समावेश होता. आता शाळा सुरू झाल्या असल्या तरी त्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून परवाने आणि इतर प्रश्न निकाली काढण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी शंभर टक्के प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी या निमित्ताने दिली. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेणारी पनवेल विद्यार्थी वाहक संस्था ही एकमेव संघटना मला पहावयास मिळते. सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय सामाजिक कार्य पांडुरंग हुमणे आणि त्यांचे सहकारी करीत असल्याचे प्रतिपादन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी  केले. विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करण्याची मोठी जबाबदारी विद्यार्थी वाहक पार पडतात. परंतु लहान मुलांच्या सुरक्षिततेची  आणखी खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना  केले. माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनीही या कार्यक्रमाला भेट देऊन आपले मनोगत व्यक्त केले. वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image