अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पथकाकडून कळंबोलीतुन सव्वा कोटीची चोरी उघडकीस...
अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पथकाकडून कळंबोलीतुन सव्वा कोटीची चोरी उघडकीस...


पनवेल / दि.३१ (वार्ताहर) : अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पथकाने कळंबोली स्टील मार्केट परिसरातून सव्वा कोटीची चोरी उघडकीस आणली आहे. 
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांच्या विशेष पथकाने कळंबोली स्टील मार्केट गोदाम क्रमांक ६६४ मध्ये धाड टाकण्यास गेले असता या गोदामासमोरील रस्त्यावर लोखंडी सळईने भरलेल्या तीन ट्रेलरमधील सळई काढताना काही जणांना ताब्यात घेतले. यावेळी सदर ट्रेलर व मालाची किंमत ८७ लाख ७२ हजार एवढी होती. तर गोदामामध्ये या पथकाला ३५ लाख रुपयाच्या चोरीच्या सळईचा माल सापडला. सदर ट्रेलर हे तळोजा येथील जिंदाल स्टील कंपनीच्या सळ्याभरून भिवंडी येथे जाणार होते. परंतु चालक व मालकाने परस्पर सळई विक्रीसाठी कळंबोली येथील या गोदामात ट्रेलर आणल्याचे अधिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी या पथकाने सात जणांना अटक केली असून इतर बारा आरोपी फरार आहे.
Comments