इंटक व पनवेलशहर जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा ६ जानेवारीला होणार साजरा....

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह नेतेमंडळींची उपस्थिती लाभणार...

मेळाव्याच्या पूर्वतयारीनिमित्त पनवेल काँग्रेस भवनात बैठकीत नियोजन पूर्ण...

पनवेल / प्रतिनिधी : - 
          संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसला चांगले दिवस आले आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. युवक आणि महिला उत्साहाने पक्षात काम करताना दिसून येत आहेत. पक्षात सर्वांची एकजूट महत्वाची आहे. यासाठी आपापसातील मतभेद, हेवेदावे दूर करा. काँग्रेस सोडून इतर पक्षात जे गेले आहेत त्यांना त्याठिकाणी सन्मानाची वागणूक मिळत नाही. त्यांना सन्मानाने पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये आणून घरवापसी करा, असे आवाहन रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी केले. ते पनवेल काँग्रेस भवन येथे आयोजित महत्वाच्या बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.
         इंटक व पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवार दि.६ जानेवारी रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाटयगृहात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ठीक ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीनिमित्त आज (मंगळवार दि.३ जानेवारी) पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ६ जानेवारी रोजी आयोजित इंटक व पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळाव्यादरम्यान पनवेल शहर जिल्ह्याच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा, पनवेल अर्बन बँकेचे नवनिर्वाचित संचालक तसेच पनवेल उरण तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार, हात से हात जोडो अभियानासंदर्भात माहिती व नियोजन, अन्य पक्षातून कॉंग्रेसमध्ये येणाऱ्यांचा पक्ष प्रवेश यासह विविध महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.
          याप्रसंगी ठाण्याचे माजी महापौर तथा पनवेल शहर जिल्हा काँग्रेस निरीक्षक सुभाष कानडे, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभिजीत पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, ऍड.अरुण कुंभार, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अखलाख शिलोत्री, तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी, महिला जिल्हाध्यक्ष निर्मला म्हात्रे, युवक जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, नौफिल सय्यद, मोहन गायकवाड, लतीफ शेख, मल्लिनाथ गायकवाड, अरविंद सावळेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोट:
काँग्रेस मधील जे कार्यकर्ते काँग्रेसला सोडून इतर पक्षात गेले आहेत त्यांची घरवापसी करून काँग्रेसची ताकद वाढवणे गरजेचे आहे. आगामी पनवेल महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने तन-मन-धन अर्पण करून काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी कटिबद्ध राहावे. हात से हात जोडो हे अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी पनवेल काँग्रेसमधील महिला, युवक, अल्पसंख्याक, दलित सेल व इतर सर्व विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कसोशीने, एकजुटीने मेहनत घ्यावी.
- अभिजीत पाटील, जिल्हाध्यक्ष- पनवेल शहर काँग्रेस

कोट:
अभिजीत पाटील यांच्या रूपाने पनवेल शहर जिल्हा काँग्रेसला एक अभ्यासू व सक्षम नेतृत्व लाभले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची प्रतिमा संपूर्ण जगभरात झाली असल्याचे सर्वांनी भारत जोडो यात्रेदरम्यान अनुभवले. ज्याप्रमाणे राहुल गांधी अपार मेहनत घेत आहेत त्याप्रमाणे काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. काँग्रेसच्या राज्यात कोणीही कोणाला जात विचारली नाही; मात्र आजच्या घडीला मोदी सरकार देशात तिरस्कार पसरवत आहे. यासाठी सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या दारोदारी पोहचून काँग्रेसची नाळ जोडणे आवश्यक आहे.
- सुभाष कानडे, पनवेल जिल्हा निरीक्षक
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image