तळोजा औद्योगिक वसाहतीमधील रिद्धीमा पॅकेजिंग कंपनीला भीषण आग ...
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील रिद्धीमा पॅकेजिंग कंपनीला भीषण आग 

पनवेल वैभव / दि.३०(संजय कदम): तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीला भीषण आग लागण्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. रिद्धीमा पॅकेजिंग कंपनी असे कंपनीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्ग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सूरु केले. तसेच या ठिकाणी  पोलीस उपनिरीक्षक बळीराम घंटे यांच्यासह अंमलदारांसह हजर होते. या आगीच्या घटनांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.  फोटो:  रिद्धीमा पॅकेजिंग कंपनीला लागलेली आग
Comments