घर फोडीसह गाडी चोरी करणाऱ्या ४ सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड...
पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड...

पनवेल / दि.०६ (संजय कदम): पनवेल शहर पोलिसांनी घरफोडी, गाडी चोरी तसेच इतर मालमत्ते संदर्भात चोरी करणाऱ्या ४  सराईत गुन्हेगारांना गजाआड करून त्यांच्या कडून लाखो रुपये किमतीचा चोरीचा माल हस्तगत केला आहे.  
         पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीमधील मालमत्तेचे गुन्हे संदर्भात पोलिस उप आयुक्त  परि 2  पंकज डहाणे, सहाय्य्क पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने,  पो नि पवार, पो नि शिंदे, स पो नि दळवी, पो उप नि शिंदे आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास व  गुप्त बातमीदार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घरफोडी, गाडी चोरी व इतर मालमत्ते संदर्भातील चोरी सारख्या गुन्हे करणाऱ्या ४ आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी गजाआड करून ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये प्रामुख्याने शाहिद सलीम शेख (वय 20 वर्षे रा. कॉलेज फाटा, वडघर), अनिल श्यामजी शर्मा (वय 21 वर्षे, रा. वडघर), शैलेश शिवप्रसाद पाल (वय 21 वर्षे, रा. कोळीवाडा), सूरज लक्ष्मण झावरे (वय 21 वर्षे रा. पनवेल) यांना अटक करून त्यांच्याकडून 2,61,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.  त्यांच्या टीकेमुळे पनवेल शहर हद्दीतील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Comments