सुगंध स्मृतींचा... ग्लोब मिल पॅसेज म न पा माध्यमिक शाळेचा ५० वा सुवर्ण महोत्सवी सोहळा.....
 ५० वा सुवर्ण महोत्सवी सोहळा.....
नवी मुंबई :--- ग्लोब मिल पॅसेज म न पा माध्यमिक शाळा या शाळेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शाळेच्या सर्व आजी माजी विद्यार्थी संघ यांनी सुवर्ण महोत्सवी सोहळा आयोजित केला होता.

या सोहळ्यासाठी आजी माजी विद्यार्थी संघ गेले एक महिन्यापासून तयारी करत होते या शाळेच्या पन्नास वर्ष सुवर्ण महोत्सव सोहळ्यासाठी
शाळेतील मराठी, हिंदी, व गुजराती अश्या सर्व माध्यमातून विद्यार्थ्यांना, गुरुजन शिक्षकांना आमंत्रित केले होते.सन १९७२ पासून ते आत्तापर्यंत असलेल्या सगळ्या गुरुवर्य शिक्षक आणि आजी-माजी असे 600 ते 700 विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.

शाळेबद्दल असलेले प्रेम आणि अजूनही शिक्षकांबद्दल असणारा आदर कसा असतो तो या सगळ्या आत्तापर्यंत शिक्षकांनी या सोहळा दरम्यान आपल्या भावना व्यक्त केल्या

सुवर्ण महोत्सव सोहळ्याची सुरुवात सगळ्या गुरुवर्य शिक्षकांना ओवाळणी करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दीपक प्रज्वलनानंतर राष्ट्रगीत प्रार्थना आणि आपल्या शाळेतील प्रतिज्ञा म्हणून या सुवर्ण सोहळ्यात सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता सगळ्या विद्यार्थ्यांनी जल्लोषात नाचून, गाऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image