श्री संत सेना महाराज नाभिक संस्थेच्या 150 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
हरिनाम सप्ताहास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद....

पनवेल / दि. 28 (वार्ताहर):- मुंबई कुंभारवाडा गोलदेऊळ येथील श्री संत सेना महाराज नाभिक संस्थेच्या 150 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या अखंड हरिनाम सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून शेकडो भाविकांची उपस्थिती लाभत आहेत. 
या अखंड हरिनाम सप्ताहात पहाटे चार वाजल्यापासून काकडआरती, भव्य संगीत गाथा, पारायण , प्रवचन ,हरिपाठ ,कीर्तन  महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ,ह.भ.प., महाराज यांचे मार्गदर्शन, प्रवचन लाभत आहे. या अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्‍वरी पारायण प्रमुख जयश्री बोर्‍हाडे व प्रकाश क्षिरसागर यांचे मोलाचे सहकार्य आहे. या अखंड हरिनाम सप्ताहास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याची माहिती संस्थेचे नुतन अध्यक्ष दिपक भोर व सचिव  हितेश जाधव यांनी दिली.
श्री संत सेना महाराज नाभिक ही संस्था गेली 150 वर्षे सक्रीयपणे कार्यरत असून यंदा 299 वा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करीत आहेत. 
तसेच संस्था बरीच सामाजिक कार्य देखील करीत आहे. 150 व्या वर्षानिमित्त ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात 7 दिवसांचा सोहळा नामांकीत कीर्तनकारांच्या उपस्थितीत, अभंग व भक्तीगीताने संपन्न होत आहे. 
150 वर्ष व 299 वा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे कसे काय हे कोडे प्रत्येकाला पडते .तर त्या बाबतीत संस्थेचे माजी अध्यक्ष दिलीप  खंडागळे ह्यांनी सांगितले की वर्षांतून दोन  7 दिवस चालणारे अखंड हरिनाम सप्ताह एक  माघ शु. वसंत पंचमी ते माघ शु. द्वादशी पर्यन्त चालणारा. जगतगुरु संत तुकाराम महाराज सद्गुरू भेटी निमित्त चालणारा. तुकाराम महाराजांना त्यांचे गुरू बाबाजी चैतन्य महाराज ह्यांनी शु. दशमी या दिवशी अनुग्रह दिला तो दिवस श्रावण वद्य पंचमी ते श्रावण वद्य द्वादशी संत सेना महाराज ह्यांच्या पुण्यतिथी निमित्त चालणारा अखंड हरिनाम सप्ताह. या सात दिवसात  वीणा खाली ठेवला जात नाही चोवीस सभासद रोज ठरलेल्या वेळी एक तास  विणा वाजवून प्रहर घेत असतात यात महिला प्रहरकर्‍यांचा देखील मोठा सहभाग आहे. असे माजी अध्यक्ष अनिल रायकर ह्यांनी सांगितले तर  खजिनदार श्याम माटे हे सर्व व्यवस्था व लहान मोठे काम उत्तम रित्या पार पाडत आहेत. या संस्थेच्या स्थापनेपासुन आजपर्यंत सर्व कुटुंबांची चौथी - 5 वी पिढी कार्यरत आहे. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ज्योतिषभास्कर जयंत साळगावकर, सदगुरु श्री वामनराव पै ह्यांचे प्रवचन झाले होते. सदर उत्सवाच्या शेवटच्या दिवशी गुरुवार दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी भव्य पालखी सोहळा आणि कीर्तन सोहळा होणार आहे. सकाळी ठिक 10.30 वाजता भव्य पालखीचे आणि सुश्राव्य किर्तन होऊन सांगता होणार आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुरु असलेल्या या सप्ताहाचा समारोप 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सप्ताहास संस्थेच्या महिला मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभत आहे . कीर्तन प्रवचन संपल्यानंतर भाविक महाप्रसादाचा लाभ दररोज घेत आहेत .या अखंड हरिनाम सप्ताहास मुंबईतील, तसेच मुंबई बाहेरील अशा अनेक सभासदांचे सहकार्य लाभत आहे. संस्थेस मदत केलेल्या सर्व दानशूर सभासदांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.


फोटो:अखंड हरिनाम सप्ताह
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image