कामगार नेते महेंद्र घरत यांच्या संघटनेची घोडदौड कायम ; शेरॉन बायोमेडिसिन मधील कामगारांना ८००० रुपये पगारवाढ...
 कामगारांना ८००० रुपये पगारवाढ...
    
पनवेल वैभव वृत्तसेवा : - कामगार नेते तथा रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील NMGKS संघटनेची घोडदौड सुरु आहे. रायगड, नवी मुंबईतील कामगारांसाठी आपले न्याय -हक्क मिळवून देणारी न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटना ही एकमेव संघटना आहे. या वर्षातील संघटनेमार्फत हा 15 वा पगारवाढीचा करार मे. शेरॉन बायोमेडिसिन प्रा. लि. तळोजा या कंपनीतील कामगारांसाठी करण्यात आला.
      
कंपनी लिक्विडेशन मुळे बँकेच्या ताब्यात असताना  कंपनी सुरु राहणं व कामगारांची नोकरी टिकविणे महत्वाचे होते. अशावेळी संघटनेच्या यशस्वी माध्यस्थीमुळे कामगारांना तीन वर्षासाठी रुपये 8000/-पगारवाढ करण्यात आली. त्याच बरोबर दिवाळी बोनस प्रत्येकी 18000/-रुपये, तीन लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी देण्याचे कंपनीतर्फे मान्य करण्यात आले. पगारवाढिची थकबाकी (एरियर )31डिसेंबर पूर्वी देण्याचेही मान्य करण्यात आले आहे.
    
या करारनाम्याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते महेंद्रजी घरत, कार्याध्यक्ष -पि. के. रमण, सरचिटणीस -वैभव पाटील, कंपनी CEO- कौशिक बॅनर्जी, असिस्टंट जनरल मॅनेजर -माया शर्मा,प्लॅन्ट मॅनेजर -संदीप ओझा, एच. आर. मॅनेजर -नितीन मेश्राम, कामगार प्रतिनिधी -महेंद्र ढोंगरे, रोहन कोळी, अनिल ढोंगरे, महेश पाटील, विद्यानंद पाटील, महेश लहू पाटील आदी उपस्थित होते.
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image