पनवेल सेन्ट्रल रोटरी घनदाट वन प्रकल्पाचे दुसऱ्या व अखेरच्या टप्प्यातील वृक्षारोपण पार..
 अखेरच्या टप्प्यातील वृक्षारोपण पार ...
पनवेल / प्रतिनिधी : -  
संपूर्ण पनवेल पंचक्रोशी आणि रोटरी प्रांत 3131 यामध्ये गाजलेला आणि पनवेलकरांच्या गळ्यातील ताईत बनलेला  "पनवेल सेन्ट्रल रोटरी घनदाट वन " प्रकल्पाचा वृक्षारोपणाचा दुसरा आणि अंतिम टप्पा मोठ्या दिमाखात आज रविवार , दिनांक 25 डिसेंबर रोजी पार पडला .

औचित्य होतें ,रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने  पनवेल शहरामध्ये उरण रोड वरील उद्यान आरक्षित भूखंडावर रविवार, दिनांक 25 डिसेंबर रोजी " पनवेल सेन्ट्रल रोटरी घनदाट वन "प्रकल्पाचे  झालेले दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील वृक्षारोपण . रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल ची विविध लोकोपयोगी उपक्रमांसाठी असणारी तळमळ ,समस्त पनवेल करांचा लोक सहभाग ,सर्व विविध राजकीय पक्षाचे मान्यवर नेते  मंडळी , आणि पनवेल महानगर पालिका यांनी दिलेला पाठींबा यामुळे हा प्रकल्प पनवेल करांच्या दृष्टीपथात आला आहे .
या वृक्षारोपणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त आणि प्रशासक गणेश देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे मार्गदर्शक आणि रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे , यांच्या समवेत क्लबचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, पनवेल महानगरपालिका माजी सभागृह नेता रो. परेश ठाकूर , माजी नगरसेवक रो. नितीन पाटील , माजी नगरसेवक रो. अनिल भगत , कृषी उत्पन्न समिती माजी सभापती राजेंद्र पाटील, बांधकाम व्यावसायिक मंगेश परुळेकर , रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे सचिव अनिल ठकेकर , प्रोजेक्ट सचिव सुदीप गायकवाड ,  इतर रोटरीयन्स , ऍन स आणि अनेटस यांनी उपस्थित राहून आजचा वृक्षारोपणाचा दुसरा टप्पा यशस्वी पणे पार पाडला .

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेन्ट्रल च्या वतीने , रो. अमोद दिवेकर, रो. अभय गुरसळे , डॉ.  सुरेश मोरे , रो. वेलणकर , रो. भगवान पाटील , रो.सौ प्रिया पाटील , रो. सैतवडेकर, रो. जे .डी . तांडेल ,रो . मेघा तांडेल , रो . रतन खरोल , रो. अनिल खांडेकर , रो. सिकंदर पाटील , डॉ. मिलिंद घरत , डॉ. आवटे, रो. शैलेश पोटे , रो. भारत ठाकूर , रो. आरती खेर , रो. आतिष थोरात , रो. अमित पुजारी , रो. संतोष घोडींदे, रो. सुनिल गाडगीळ , रो. दीपक गडगे , रो. दर्शन वनगे , रो ्. मनोज आंग्रे , रो. आनंद रंगपरिया आणि इतर रोटरीयन्स ,ऍनस , आणि अनेटस यांनी आजच्या सोहळ्यात उपस्थित राहून आपला हातभार लावला .

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेन्ट्रल चे सर्व रोटरी सदस्य , ऍनस आणि अनेटस यांनी या उपक्रमात खूप मेहनत घेतली त्याबद्दल पनवेल सेन्ट्रल रोटरी घनदाट वन प्रकल्प समितीच्यावतीने आभार मानले.
Comments