कळंबोली सर्कल रोडवर ऑइल सांडल्याने वाहनांची घसरण ; वाहतूक शाखेची तत्परता...
वाहतूक शाखेच्या तत्परतेने वाहनांची घसरण थांबली...

पनवेल वैभव / प्रतिनिधी : - 
 
पनवेल वाहतूक शाखेच्या हद्दीत आज दुपारी 2  वाजताच्या सुमारास ठाणा नाका ते कळंबोली सर्कल रोडवर ऑइल सांडल्यामुळे वाहने घसरत असल्याबाबत माहिती प्राप्त होताच पनवेल वाहतूक शाखा पो.निरीक्षक संजय नाळे यांनी लागलीच स्वतः तसेच सोबत पनवेल वाहतूक शाखेचे पोउनि खांडेकर व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन फायर ब्रिगेड व स्थानिक लोकांच्या मदतीने रोडवरून माती पसरवून वाहतूक सुरळीत केल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळल्या आहेत. 
वाहतूक शाखेच्या या  तत्परतेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 


Comments