पनवेल वकील संघटनेच्या निवडणुकीत ऍड. मनोज भुजबळ यांची हॅट्रिक ...

 
हा तर तरुणाईचा विजय- ऍड.मनोज भुजबळ

पनवेल बार असोसिएशन कार्यकारिणीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत भुजबळ पॅनलचा दणदणीत विजय 

हा तर तरुणाईचा विजय- ऍड. मनोज भुजबळ...

पनवेल / (प्रतिनिधी) पनवेल बार असोसिएशन या वकील संघटनेच्या कार्यकारिणी कमिटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत ऍड. मनोज भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील भुजबळ पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे. या ऍड. मनोज भुजबळ यांच्यासह अकरा पैकी नऊ सदस्य निवडून आले आहेत तर एक सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. 
         प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वकील संघटनेच्या निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल बोलताना ऍड. मनोज भुजबळ यांनी आपल्या सहकाऱ्यांना व विशेष करून नवोदित वकील आणि नवीन सदस्यांनाही धन्यवाद दिले. हा माझा विजय नसून माझ्या संपूर्ण टीम आणि आमच्यावर तिसऱ्यांदा विश्वास ठेवणाऱ्या ज्येष्ठ आणि युवा वकील सहकाऱ्यांचा आहे.  निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. 
       पनवेल येथील न्यायालयाच्या नवीन इमारत येथे पार पडलेल्या निवडणूकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ एच. जे. शेळके तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ऍड. शशिकांत म्हात्रे,  ऍड. राजेश खंडागळे, तसेच ऍड.राजेश पाटील, ऍड.विकी दूसिंग, ऍड.संदीप मुंडकर, ऍड.जगदीश ठाकूर, ऍड. दक्षता पुनकर, ऍड.त्रिवेणी भगत, ऍड. सोमनाथ पाटील, ऍड.कल्पेश कांबळे या विधी तज्ज्ञांनी कामगिरी बजावली. 
या निवडणुकीत ९९७ मतदारांपैकी ९०८ वकील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

कोट-
"पनवेल कोर्टाच्या जुन्या इमारतीच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेऊन कोरोना काळात प्रलंबित राहिलेल्या कामांना गती देणार आहे. वकिलांच्या आणि विशेषतः नवोदित वकिलांच्या मार्गदर्शनासाठी मार्गदर्शन शिबीर तसेच कार्यशाळांचे आयोजन करून प्रशिक्षणासाठी अधिक लक्ष घालून वकिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार" - 
- ऍड. मनोज भुजबळ नवनिर्वाचित अध्यक्ष- पनवेल बार असोसिएशन 

 विजयी उमेदवार- 
मनोज भुजबळ- अध्यक्ष 
संदीप रमाकांत जगे- उपाध्यक्ष 
प्रल्हाद घनश्याम खोपकर- सचिव 
सीमा मंगेश भोईर- सहसचिव 
 धनराज कान्हा तोकडे- खजिनदार 
  (कार्यकारिणी सदस्य)
   प्रगती जनार्दन माळी
 अमित बाळाराम पाटील
 भूषण मोरेश्वर म्हात्रे 
Comments