नववर्षाचे स्वागत करतांना कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या - पोलीस उपायुक्त पंकज डहाणे...
 पोलीस उपायुक्त पंकज डहाणे ...

पनवेल / दि. २९ ( संजय कदम ) : नववर्षाचे स्वागत करतांना सर्व नागरिकांनी कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन परिमंडळ - २ चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी केले आहे . 
                     नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण पनवेल परिसरातील हॉटेल ,ढाबे ,  फार्महाऊस ,खासगी बंगल्यांना पार्टीच्या आयोजनासाठी पसंती देत आहेत.तालुक्यातील अनेक फार्महाऊस आणि बंगले बुक करण्यात आली आहे. परंतु या सर्व घडामोडींवर करडी नजर पोलिसांची आहे .  उत्साहात कोणताही नियमबाह्य तसेच अनुचित प्रकार सहन केला जाणार नाही, असा इशारा पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिला असून ठीक ठिकाणी नाका बंदी ,ड्रंक अँड ड्राइव्ह केसेस केल्या जाणार आहेत . अमली पदार्थाची वाहतूक व सेवन करणे या विरोधात सुद्धा कारवाई केली जाणार आहे . तरी प्रत्येकाने काळजी घेऊन कायद्याचे उल्लंघन न करता सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी केले आहे . 



फोटो - पोलीस उपायुक्त पंकज डहाणे
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image