जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन पाटील यांचा स्तुत्य उपक्रम ; युवापिढीला घडवले रायगड किल्ला दर्शन...
युवापिढीला घडवले रायगड किल्ला दर्शन  
पनवेल दि.०५ (वार्ताहर) : जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या तर्फे दरवर्षी दिपावली निमित्त किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. या स्पर्धेअंतर्गत यंदा किल्ले बांधणी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास मोफत रायगड किल्ल्याचे दर्शन घडवण्यात आले. 
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नवीन पिढीला अधिक माहिती व्हावा हा उद्देशाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन पाटील यांनी यंदाच्या वर्षी किल्ले बांधणी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास मोफत रायगड किल्ल्याचे दर्शन घडवले. या रायगड दर्शनासाठी १०० हुन अधिक जणांनी प्रस्थान केले. त्याचप्रमाणे रायगड किल्ल्यावर इतिहासाची चांगली माहिती होण्या करिता स्थानिक गाईड बरोबर पनवेल मधील दुर्गप्रेमी सागर मुंडे व त्यांचे सहकारी हे सुद्धा सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास माहिती करून दिल्याबद्दल व नीट नेटके आयोजनाबद्दल स्पर्धक व त्यांच्या पालकांनी नितीन पाटील यांचे आभार मानले. हे रायगड दर्शन यशस्वी करण्यासाठी संस्थचे सदस्य प्रसाद कंधारे, सचिन नाझरे , विजय डिसोझा, नरेंद सोनवणे, विजय वाघ, अक्षय शिंदे, नितेश भगत, प्रफुल्ल सकपाळ, अमित पालकर, कौस्तुभ मराठे, केतन खुटले, धनश्री कंधारे, रसिका खुटले, ओंकार शेलार, रवी संदेपाल, प्रतीक पोवार, आदित्य कोळी, योगांश रायकर, मयूर फडतरे, विनीत मढवी, रसिका सुतार, गायत्री सुतार, मिहीर हिंगू, तसेच अभिनव युवक मित्र मंडळाचे पदाधिकारी राजू सावंत, परेश बोरकर, प्रदीप कुंभार, मयूर चिटणीस, प्रकाश लाड यांनी विशेष मेहनत घेतली.


फोटो : जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन पाटील यांचा स्तुत्य उपक्रम
Comments