विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई...
विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई...


पनवेल / दि.२४ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील बंबावीपाडा येथे चहाच्या टपरीमध्ये विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यावर पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली असून त्याच्याकडून देशी दारूच्या २७ बाटल्या जप्त करण्यात आले आहे. 
बंबावीपाडा येथे एक इसम चहाच्या टपरीमध्ये विनापरवाना दारू विक्री करताना पनवेल शहर पोलिसांना आढळून आला. यावेळी पोलिसांनी त्याच्या टपरीमधून देशी दारूच्या एकूण ९४५/- रू किंमतीच्या २७ बाटल्या जप्त केल्या आहेत.
Comments