ड्रायव्हर्स ने केली कंपनीच्या डिझेलची परस्पर विक्री....
ड्रायव्हर्स ने केली कंपनीच्या डिझेलची परस्पर विक्री....

पनवेल / दि.३१ (संजय कदम) : कंपनीच्या सुपरवायझरने रोडरोलरमध्ये भरण्यासाठी दिलेले ४०३ लिटर डिझेलची परस्पर विक्री केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमीटेड कंपनीमध्ये रोड रोलरवर ड्रायव्हर म्हणून करणाऱ्या चिंचपाडा येथील आरोपी रशिद अन्सारी व नौशाद अन्सारी यांना कंपनीचे सुपरवायझर यांनी रोडरोलरमध्ये भरण्यासाठी दिलेले ३७ हजार रुपये किमतीचे ४०३ लिटर डिझेलची परस्पर विक्री केली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments