किशोर बागडे यांची जनकल्याण सहकारी बँक लिमिटेडच्या उपाध्यक्षपदी निवड ....
किशोर बागडे यांची जनकल्याण सहकारी बँक लिमिटेडच्या उपाध्यक्षपदी निवड ....

पनवेल दि.०९(संजय कदम): जनकल्याण सहकारी बँक लिमिटेडच्या संचालक तसेच उपाध्यक्षपदी किशोर बागडे यांची निवड झाल्याने आज विशेष सत्कार पनवेल शाखेत व्यापारी बांधव व नागरिकांच्यावतीने करण्यात आला. 
          त्यानिमित्ताने पनवेल शाखेच्या वतीने शाखाधिकारी महेश कांबळे  तसेच पनवेल महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका रुचिता मुग्धा गुरुनाथ लोंढे व उद्योजक राजेंद्र बोरा, पत्रकार संजय कदम, उद्योजक इंदर सिंग चुंडावत, महेंद्र पुरोहित यांच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन किशोर बागडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुख्य कार्यालयातून आलेले मिलिंद घोसाळकर, अमृता बेंद्रे, उमेश बुगडे आणि पनवेल शाखेतील कर्मचारी व काही सभासद उपस्थित होते.
फोटो : किशोर बागडे यांचा सत्कार
Comments