स्वाभिमानी समाजसेवक प्रभुदास भोईर यांचा मुंबईत सन्मान...



राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून शुभेच्छाचा वर्षाव...

पनवेल / प्रतिनिधी/ -- पनवेलच नाही तर नवी मुंबई, रायगड, ठाणे परिसरात सामाजिक क्षेत्रात जनतेला न्याय व गोर गरिबांच्या हाकेला धावून जाणाऱ्या समाजशील, कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या प्रभुदास भोईर (अण्णा) यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल मुंबई येथील राष्ट्रीय मानव अधिकार संघाने घेतली असून भोईर यांना मुंबई सांताक्रुज मध्ये फिल्म इंडस्ट्रीचे म्युझिक डायरेक्टर इस्माईल दरबार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रभुदास भोईर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी राजकीय,  सामाजिक, क्षेत्रातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

पनवेल तालुक्यातील कळंबोली खिडूकपाडा गावामध्ये राहणारे प्रभुदास (अण्णा) भोईर हे आहेत. भोईर हे सामान्य जनतेसाठी लढणारा समाजसेवक आहे. ज्याने स्वतःच्या स्वार्थासाठी कधी काही केलं नाही आणि लढलाही नाही पण त्यांनी सामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले असे एक स्वाभिमानी समाजसेवक कार्यकर्ता प्रभुदास भोईर अशा व्यक्तीची दखल घेत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत भाई पाटील यांनी प्रभुदास भोईर यांना शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र पदक वाहतूक संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रभुदास भोईर त्यांचे काम पाहता त्यांना विविध संघटनेच्या माध्यमातून जनतेसाठी लढणारा योद्धा आणि अनेक पारितोषिक बक्षीस सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर भोईर यांनी कोरोना काळातील लॉकडाउन मध्ये गोर गरिबांना अन्नधान्य, औषध वाटप कळंबोली, पनवेल परिसरात वाटप केले होते. तसेच नुकताच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत कळंबोली पोलीस ठाण्याच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे पाच हजारच्या कार्यकर्तेसह भोईर यांनी या शिबिरात सहभाग घेत. रक्तदानाचे मूल्य कामही भोईर यांनी केले होते. अश्या विविध प्रकारे सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारा समाजशील कार्यकर्ता प्रभुदास भोईर यांना राष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या वतीने मुंबई सांताक्रुजमध्ये फिल्म इंडस्ट्रीचे म्युझिक डायरेक्टर इस्माईल दरबार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रभुदास भोर यांना सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना पारितोषिक मिळाले. हा सन्मान मिळाल्याने त्यांना शेकापा सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आमदार बाळाराम पाटील माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, ज्येष्ठ नेते नारायण शेठ घरत, मा.सभापती काशिनाथ पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छाचा वर्षाव भोईर यांच्यावर होत आहे.
Comments