गोल्डन ग्रुप पनवेलच्या अध्यक्षपदी अमोल गोवारी...
गोल्डन ग्रुप पनवेलच्या अध्यक्षपदी अमोल गोवारी...
पनवेल /  प्रतिनिधी : - 

पनवेल येथील बहुचर्चित गोल्डन ग्रुप पनवेलच्या अध्यक्षपदी अमोल गोवारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

गोल्डन ग्रुप पनवेलच्या काल झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुढील वर्षाकरिता नवीन कार्यकारणी निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी अमोल गोवारी, उपाध्यक्षपदी विजय पाटील, सरचिटणीस पदी विवेक पाटील, सहचिटणीस पदी अशुतोष पाटील, खजिनदार पदी संजय कोलकर, तसेच सल्लागार म्हणून तुळशीराम सत्रे, वसंत भगत, निळकंठ भगत, मंदार दोंदे, राम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

या सर्वसाधारण सभेप्रसंगी नवनिर्वाचित कार्यकारिणीसह नरेश पाटील ( शिवकर ), रामचंद्र राऊत, संतोष कल्याणकर, नरेश पाटील ( मोहो ), विजय पवार, प्रकाश फडके उपस्थित होते. तर जितेंद्र भगत, जितेंद्र चोपडे, प्रमोद भिंगारकर, अनिल नलावडे, नितीन भगत, शिवाजी लखंबले आदींनी  नवनिर्वाचित कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या आहेत. 

यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष अमोल गोवारी म्हणाले की, आगामी काळात गोल्डन ग्रुप पनवेल चे नाव आणि लौकिक सर्वत्र पसरण्यासाठी आम्ही जोमाने काम करणार असून नवीन नवीन उपक्रम आम्ही राबविणार आहोत. याआधीही गोल्डन ग्रुप पनवेल ने समाजसेवेचा नवा आदर्श घालून दिला आहे. आदिवासी वाडी वरील मुलांना गणवेश, दप्तर, वह्या पुस्तके त्याचप्रमाणे एका संपूर्ण शाळेचा कायापालट गोल्डन ग्रुप ने केला आहे. झाडे लावणे, श्रमदान करणे, आपत्तीग्रस्तांना मदत करणे असे अनेक उपक्रम गोल्डन ग्रुपने आत्तापर्यंत राबविले आहेत. यापुढे ही आम्ही गोल्डन ग्रुपचे सर्व सदस्य समाजाप्रती आपले कर्तव्य करत राहू अशी आम्ही ग्वाही देतो.
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image