रेल्वे प्रवासात चोरीस गेलेले मोबाइल प्रवाशांना मिळाले परत...
रेल्वे प्रवासात चोरीस गेलेले मोबाइल प्रवाशांना मिळाले परत...


पनवेल दि. १७ (वार्ताहर) : पनवेल रेल्वे पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात रेल्वे प्रवासात झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून प्रवाशांना त्यांचे मोबाइल परत देण्यात आले आहेत.
विचुंबे येथे राहणारे महेश बुदगे मुंबईला कामानिमित्त जात असताना त्यांचा साडे सोळा हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरट्यांनी पळवून नेला होता. याप्रकरणी रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. तसेच खांदा कॉलनीमध्ये राहणारा प्रशांत अरोलकर हा तरुण खारघर रेल्वे स्टेशनमध्ये लोकलमध्ये चढत असताना चोरट्यांनी त्याच्या खिशातील आठ हजार नऊशे रुपये किमतीचा मोबाइल चोरून होता. या दोन्ही गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून प्रवाशांना त्यांचे मोबाइल परत करण्यात आले आहे. तसेच मोबाइल परत मिळाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
Comments