उलवे नोड वासियांना मिळणार 17 वर्षानंतर हक्काची स्मशानभूमी...


जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : उलवे नोड ची स्थापना होउन गेल्या १७ते १८ वर्षात दोन लाखाहुन अधिक लोक रहायला आले परंतू कुणाचा मृत्यु झाल्यास  अंत्यविधीसाठी उलवे नोडसाठी स्मशानभूमी नसल्यामुळे, प्रकल्पग्रस्त  गावकऱ्यांना  विनंती करावी लागत असे, त्यातील अनेक गावांनी नोडलमधील मयत त्यांच्या स्मशानात जाळण्यासाठी मज्जाव केल्यामुळे, मयत घेऊन नातेवाईकांना सि.बी.डी. बेलापूर, खारघर, वाशी येथे अंत्यविधीसाठी जावे लागत असे. उलवे नोड मधील अनेक नागरिकांच्या फोरमने, सिडकोबरोबर संघर्ष करून प्रकल्पग्रस्त गावासाठी, खेळाची मैदाने, स्मशानभूमी कम्युनिटी हॉल, शाळा, वॉटर टँक, गटर अश्या अनेक सुविधा मिळवून देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे लढाऊ डॅशिंग नेते महेंद्र घरत यांना समस्याग्रस्त उलवे नोडच्या समस्या सोडविण्यासाठी मदतीची आर्त साद घातली. गोरगरीब प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडविण्यामध्ये माहीर असलेल्या कामगार नेते महेंद्र घरत यांनी सिडको स्तरावर एम.डी.,जॉईंट एम.डी.यांच्या बरोबर उलवे नोड नागरिकांच्या मिटींग घेऊन तातडीने हालचाल करून उलवे नोड मधील समस्या सोडविण्यासाठी तातडीने सुरवात केली.  सर्वप्रथम उलवे नोडमधील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करून घेतले, पाणीपुरवठा अतिशय कामिदाबाने उलवे नोडमध्ये होत होता, सिडको, MIDC, नवी मुंबई, पनवेल कॉर्पोरेशन च्या अधिकाऱ्यांची राज्य शासनाच्या स्तराच्या मिटिंग लावून उलवे नोडमधील पाणीपुरवठा सुरळीत व नियमित करून घेतला.गेल्या ५ वर्षांच्या खडतर पाठपुराव्याने १.५ करोड निधी मंजूर करून उलवे नोडसाठी हक्काची स्मशानभूमी सेक्टर १४ मध्ये बांधन्यास घेतली व उलवे नोड वासीयांची मृत्यू नंतर होत असलेली सशेहोलपट थांबवली. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ या उक्तीप्रमाणे उलवे नोडमधील सर्व समस्या निराकरणासाठी महेंद्र घरत कटिबद्ध आहेत असे दाखवून दिले. उलवे नोडमधील शाळा, कॉलेज, गार्डन, मंदिर, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, महिला मंडलांसाठी तसेच सामाजिक सुविधांचे प्लॉट चे टेंडर काढण्यास भाग पाडले. २००४ साली आगरी कोळी, नेरूळ भवन च्या निर्मिती नंतर सतत पाठपुरावा करून उलवे नोडमध्ये भुमीपुत्र भवन साठी तत्कालीन एम. डी. श्री.सत्रे, चेअरमन नकुल पाटील, डायरेक्टर नामदेव भगत यांच्या माध्यमातून निधी मंजूर करून, भुमीपुत्र भवनचे टेंडर काढेपर्यंत पाठपुरावा केला. आज भुमीपुत्र भवन उलवे नोड मध्ये दिमाखात उभे आहे. लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील साहेबांनंतर प्रकल्पग्रस्तांसाठी लढणारे नेते हे महेंद्र घरत आहेत.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र राज्य महामंडळातील संचित तोटा संदर्भात चौकशी करणेबाबत महामाहीम राष्ट्रपतींना निवेदन..
Image
'कमवा आणि शिका' उद्दिष्टाने कमवले “बार काउन्सिल ऑफ़ इंडिया” चे सदस्यत्व आणि 'मास्टर ऑफ लॉ' पदवी ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन व कौतुक
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image
शिवबंधन बांधून शेकडो महिलांनी केला शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश...
Image