" रोटरी घनदाट जंगल प्रकल्पाचे" अनोखे उदघाटन...


पनवेलकरांचे घनदाट जंगलाचे स्वप्न येणार दृष्टीपथात ...!
पनवेल / वार्ताहर :- 
पनवेल मध्ये घनदाट जंगल शक्य आहे का ??  असा प्रश्न जो पनवेलकरांना पडला होता त्याचे उत्तर आज समस्त पनवेलच्या सुजाण नागरिकांना मिळाले आहे .
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने  पनवेल शहरामध्ये उरण रोड येथील उद्यान आरक्षित भूखंडावर रविवार, दिनांक 6 नोव्हेंबर रोजी " रोटरी घनदाट जंगल प्रकल्पाचे" झालेले अनोखे उदघाटन झाले.
या उपक्रमाद्वारे पनवेलकरांचे घनदाट जंगलाचे  स्वप्न आता दृष्टीपथात येऊ शकते. समस्त पनवेलकरांचा लोक सहभाग ,सर्व विविध राजकीय पक्षाचे मान्यवर नेते , सर्व शासकीय अधिकारी , पत्रकार , रोटरी सदस्य यांच्या उपस्थितीत आजचा उदघाटन सोहळा दणक्यात पार पडला .
या उदघाटन सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे एवढ्या सगळ्या मोठ्या विविध पक्षातील राजकीय मंडळींची मांदियाळी एकाच  ठिकाणी आणि एकाच वेळी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेन्ट्रलच्या मुळे पहावयास मिळाली.कोणतेही मोठे व्यासपीठ नाही ,कोणतीही भाषणे नाहीत, तरीसुद्धा आपले राजकीय मतभेद विसरून पनवेल मधील सर्व राजकीय नेते मंडळी गप्पांमध्ये बुडून गेलेले अनोखे चित्र आणि दुर्मिळ योग पनवेलकरांना पहावयास मिळाला .रोटरी क्लब ऑफ पनवेलचे मार्गदर्शक आणि रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ . गिरीश गुणे यांनी डॉ . संजीवनी गुणे यांच्या समवेत क्लबचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ फोडून या महत्वाच्या प्रकल्पाचे उदघाटन केले .
या वृक्षारोपण प्रसंगी , माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर ,आमदार प्रशांत ठाकूर , आमदार बाळाराम पाटील ,  पनवेल महानगरपालिका माजी महापौर डॉ.कविता चौतमल , पनवेल महानगरपालिका मा .सभागृह नेता व रोटरीयन परेश ठाकूर ,पनवेल नगरपालिका माजी नगराध्यक्ष जे एम . म्हात्रे ,रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील,पनवेल महानगर पालिका मा .विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे,   रामदास शेवाळे, काशिनाथ पाटील ,  नारायणशेठ घरत , गणेश कडू  ,  प्रथमेश सोमण , अरूणशेठ भगत , वाय . टी . देशमुख ,  जयंत पगडे ,रमेश गुडेकर ,जयंत भोईर , पनवेल नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत , विस्टा प्रोसेसड फूड चे अधिकारी , यमुना शैक्षणिक संस्थेचे महेंद्र शेठ घरत यांचे चिरंजीव आणि त्यांचे प्रतिनिधी आणि पनवेल महानगरपालिकेचे जवळपास सर्वच माजी नगरसेवक यांनी वृक्षरोपण करून या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या . 

तसेच रोटरी प्रांत 3131 च्या वतीने प्रांतपाल डॉ अनिल परमार , फर्स्ट लेडी डॉ . हेमा परमार , पल्लवी साबळे , संतोष मराठे आणि इतर क्लबमधील अध्यक्ष आणि सदस्यांनी उपस्थित  राहून आणि वृक्षारोपण करून या महत्त्वपूर्ण उपक्रमाची ख्याती संपूर्ण प्रांत 3131 मध्ये झाली आहे याची पोच पावतीच जणू काय दिली आहे  .
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेन्ट्रलच्या वतीने सचिव रो .अनिल ठकेकर , प्रकल्प सचिव रो . सुदीप गायकवाड , रो. अभय गुरसळे ,रो . वारंगे  व रो . सौ .वारंगे, रो . वेलणकर , रो .  भगवान पाटील व रो . प्रिया पाटील , रो. सैतवडेकर,रो . जे .डी . तांडेल , डॉ. आवटे , डॉ. मिलिंद घरत ,डॉ. तुषार जोशी , डॉ.  हितेन शहा ,डॉ , कुलकर्णी , रो . शैलेश पोटे , रो. आतिष थोरात ,रो . अमित पुजारी , रो . ऋषीकेश जोशी ,रो . रवी भोसले , रो.संतोष घोडींदे, रो . सुनिल गाडगीळ , रो. दीपक गडगे , रो . ऋषी बुवा , रो . विक्रम कैया, प्रीतम कैया , रो.डॉ . राजेश गांधी , रो . सायली सतावळेकर , रो .आकांक्षा भोईर ,  इतर रोटरीयन्स ,ऍनस , अनेटस ,आणि रोट्रक्टर्स यांनी आजच्या या भव्यदिव्य उदघाटन सोहळ्यात उपस्थित राहून वृक्षारोपण केले .

या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या उदघाटन सोहळ्यात जवळपास 400 मोठया आणि वाढलेल्या झाडांचे वृक्षरोपण करत पनवेलकरांनी  भरभरून दिलेला उदंड प्रतिसाद डोळ्यात भरण्यासारखा होता  . 
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेन्ट्रल चे सर्व रोटरी सदस्य , ऍनस आणि रोट्रॅक्टर हे आजच्या या उदघाटन प्रसंगी विशेष मेहनत घेताना दिसून आले .
या रोटरी घनदाट जंगल प्रकल्प उदघाटन सोहळ्यात  मान्यवरांनी  दाखविलेल्या उपस्थितीबद्दल रोटरी घनदाट जंगल प्रकल्प समितीच्या वतीने आभार मानले.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image