युवानेते कुणाल महेंद्रशेठ घरत यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा..

युवानेते कुणाल महेंद्रशेठ घरत यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा


पनवेल  : - आपल्या वडिलांकडून सामाजिक बांधिलकीचे धडे गिरवत कोरोना काळात हजारो गरजूंना शिजवलेले अन्न व जीवनावश्यक अन्नधान्याची मदत करणारे युवा नेते  कुणाल महेंद्रशेठ घरत यांचा ४ नोव्हेंबर रोजी वाढदिवस विविध समाजपयोगी उपक्रमांनी साजरा झाला.

यावेळी राजू लक्ष्मण आदमळे हे मुळचे साताऱ्याचे सध्या कळंबोली येथे राहत असलेले गृहस्थ घरोघरी अगरबत्ती विकण्याचे काम करायचे त्यांना अर्धांग वायूचा झटका आला त्यात ते हतबल झालेत्यांनी आपली कैफियत महेंद्रशेठ घरत यांना सांगितली असता त्यांना जागेवर बसून धंदा करण्यासाठी राजू आदमळे यांना स्टॉल बांधून दिला त्याच्या चाव्या त्यांना वाढदिवसाच्या दिवशी हस्तांतर करण्यात आल्या, कोरोना काळात यमुना सामजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ४ रुग्णवाहिका २४ तास कार्यरत होत्या रुग्णवाहिकेचे महत्व समजून उलवे नोडसाठी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती याचे गांभीर्य लक्षात घेऊन महेंद्रशेठ घरत यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णवाहिका लोकार्पण केली. तसेच रोटरी क्लब ऑफ सेंट्रल यांच्या विद्यमाने रोटरी घनदाट जंगल प्रकल्पास ५० झाडे संवर्धनासाठी एक लाख रुपयांचा धनादेश दिनांक ६ नोव्हेंबर रोजी देण्यात येणार आहे.

           उलवे नोड कॉंग्रेस पक्ष कार्यालय येथे छोटेखानी पार पडलेल्या कार्यक्रमात स्टॉल हस्तांतरण व रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली. यावेळी शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख जेष्ठ नेते  बबनदादा पाटीलरायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरतनाशिक येथील प्रसिद्ध उद्योजक प्रकाश चौधरीउद्योजक  सुरेश पाटीलमाजी उपसभापती वसंत काठावलेपनवेल तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष  नंदराज मुंगाजीउरण तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष  विनोद म्हात्रेपेण तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक मोकलखोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जॉनजिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटीलरायगड जिल्हा युवक अध्यक्ष निखील डवळेपनवेल शहर जिल्हा महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रेपनवेल तालुका महिला अध्यक्षा  योगिता नाईक तसेच शेकडोंच्या संख्येने नातेवाईक व मित्रमंडळींनी उपस्थित राहून कुणाल घरत यांस शुभेच्छा दिल्या.

Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image