पनवेल परिसरातील दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार एक जखमी...
पनवेल परिसरातील दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार एक जखमी... 

पनवेल /  दि. १७ ( संजय कदम ) : पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार एक  जखमी झाल्याची घटना घडली आहे . 
             पनवेल जवळील गव्हाण फाटा पाण्याच्या टाकी जवळील ब्रिज वरून साईनाथ पवार ( वय ६५ ) हे त्यांची पत्नी मंगल पवार (वय ३५ ) यांना घेऊन मोटार सायकलीवरून उलवे येथून त्यांच्या राहत्या घरी कळंबोली येथे जात असताना  ब्रिज  वरील स्पीड ब्रेकर वर मोटारसायकल आपटल्यामुळे झालेल्या अपघातात मंगल पवार या गंभीररित्या जखमी होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे . या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे . तर दुसऱ्या घटनेत माता दी टेकडीच्या खालील बाजूस नगिना ढाब्या समोर अशितोष  गुंजाळ ( वय २४ ) हे सदर ठिकाणी सायकल चालवत असताना भरधाव वेगात आलेल्या ट्र्क ने त्यांच्या सायकल ला धक्का दिल्याने झालेल्या अपघातात ते जखमी झाले आहेत . या अपघातानंतर ट्र्क चालक ट्र्कसह पसार झाल्याने या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Comments