विस्टा प्रोसेस फूड्स च्या माध्यमातून विदयार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप...
विस्टा प्रोसेस फूड्स च्या माध्यमातून विदयार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप...

पनवेल / प्रतिनिधी : - विस्टा प्रोसेस फुड आणि सल्लागार चंद्रशेखर सोमण यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा पडघे येथे शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व वॉटरबॅगचे वाटप करण्यात आले.
 
या कार्यक्रमासाठी उपस्थित विस्टा प्रोसेस फूडचे सल्लागार चंद्रशेखर सोमण,मॅनेजर सौ.आगलावे,
 मॅनेजर प्रवीण ठाकूर, श्री मटकर कनिष्ठ अभियंता पंचायत समिती पनवेल,श्री म्हात्रे केंद्र प्रमुख, गजानन जोशी निवृत्त नेव्ही अधिकारी, 
हिरामण भोईर, मिन्नाथ भोईर, सोमनाथ  जोशी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ म्हात्रे ,शिक्षिक संगीता मोकल , शिक्षक सुभाष भोपी रतिलाल महाजन , संजय पाटील आदी उपस्थित होते.
  
कार्यक्रमास शालेय विद्यार्थी मोठया संख्येने हजर होते, या कार्यकामाचे कौतुक पडघे ग्रामस्थांनी करुन विस्टा फूड्स कंपनीच्या सामाजिक कार्याबद्दल आभार  व्यक्त केले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विश्वास पेटकर यांनी पुढाकार घेतला होता.
Comments