जनसंपर्क कार्यालयामध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणार - शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे ...
 जनसंपर्क कार्यालयामध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील - शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे ..

पनवेल दि.१५ (वार्ताहर) : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयातून गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने कामे होणार आहेत. हे कार्यालय जनतेचे असून येथे येणारा कोणीही खाली हात जाणार नाही असा आत्मविश्वास बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांनी व्यक्त केला.
         कळंबोली सेक्टर 4, प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन रामदास शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत असल्याने त्यांना सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे  बाळासाहेबांच्या शिवसेनेने राजकीय विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. पक्ष संघटना मजबूत आणि बळकट करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण सुरू आहे. कळंबोली वसाहतीमध्ये बाळासाहेबांची शिवसेनेने विस्तारण्यास सुरुवात केली आहे. शहर प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
           रामदास शेवाळे यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि फीत कापून एक प्रकारे जनसंपर्काचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकहिताच्या दृष्टिकोनातून अनेक कामे गेल्या काही महिन्यांमध्ये केले आहेत. निर्बंध हटवल्यामुळे दहीहंडी, गणेशोत्सव, दीपावलीचा सण मोठा उत्साहात नागरिकांना साजरा करता आला. सर्वसामान्यांच्या हितासाठी शिंदे- फडणवीस सरकारने अनेक निर्णय घेतले असल्याचेही रामदास शेवाळे यांनी सांगितले. मुख्यमंत्री महोदयांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालले असल्याचे ते म्हणाले. ते तळागळातील सर्वसामान्य जनतेचे मुख्यमंत्री असून लोकांच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व असल्याचेही रामदास शेवाळे यांनी सांगितले. कळंबोली या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील. रहिवाशांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्याची सोडवणूक केली जाईल अशी ग्वाही यावेळी शेवाळे यांनी दिली. 
          रामदास शेवाळे यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि फीत कापून एक प्रकारे जनसंपर्काचा शुभारंभ करण्यात आला. शहर प्रमुख तुकाराम सरक यांनी संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला भाजपचे स्थानिक नेते बबन बारगजे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी मित्र पक्षाच्या या जनसंपर्क कार्यालयाला शुभेच्छा दिल्या.


फोटो : कळंबोली सेक्टर 4 मध्ये शिवसेना कार्यालयाचे रामदास शेवाळे यांच्या हस्ते उद्घाटन
Comments