आंबे,शिरवलीतील वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत जागृती फॉउंडेशनचे महावितरणला निवेदन...
पनवेल /प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील आंबे शिरवली भागात वारंवार वीज पूरवठा खंडित होत असतो ,लाईट गेली कि कधी कधी दोन दोन चार चार दिवस येत नाही यामुळे विध्यार्थ्यांना शाळा कॉलेज मधून घरी आल्यावर अभ्यास करायला मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षणावर परिणाम होत आहे .याबाबत वीज पुरवठा सुरळीत व अखंडित ठेवण्यासाठी जागृती फॉउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवली विभागीय अध्यक्ष प्रितेश भोईर यांनी महावितरणला निवेदन देऊन वीज वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निवेदन दिले आहे .यावेळी सोबत तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे ,तळोजा विभागीय उपाध्यक्ष संदेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
तळोजा ,वावंजे ,शिरवली परिसरात सध्या बिबट्या ,वाघ सदृश्य प्राणी संचार करीत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत . त्यातच या भागात अनेक वेळा बत्ती गुल असते रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अशा प्राण्यांचा बाल,अबाल वृद्ध ,महिलांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही या परिस्थीचा गांभीर्याने विचार करून आंबे ,वावंजे परिसरात वीज पुरवठा कसा अखंडित राहील ,तसेच गावाच्या रस्त्यालगत ,विजेचे पोल बसवावे तसेच गावात असणारे विजेचे खांबावरील लाईट , अखंडित रात्रीच्या वेळेस सुरु राहील याची तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जागृती फॉउंडेशन ने महावितरण कडे केली आहे .