इमानदार पोलीस नाईक सुधाकर पाटील यांनी हरवलेल्या दागिन्यांची पिशवी केली ग्राहकास परत..
 दागिन्यांची पिशवी केली ग्राहकास परत

पनवेल दि.०६ (वार्ताहर) : पोलीस म्हटले की दरारा पोलीस म्हटले की करड्या नजरेचा दबदबा परंतु त्यांचा हा दमदार पणा बेशिस्तीच्या व दंडेलशाहीच्या व दादागिरीवर वचक ठेवण्याकरीता असतो त्यांच्यातही एक माणुसकी चा व ईमानदारीचा झरा कुठेतरी अंतर्मनात असतोच. याचे उत्तम उदाहरण नुकतेच कळंबोली वासीयांना पहावयास मिळाले. 
ईमानदार पोलीस नाईक सुधाकर पाटील हे खांदा कॉलनी येथील सप्तश्रृंगी सांस्कृतिक मंडळ येथे नवरात्री निमित्ताने रात्री बंदोबस्तास होते रात्रीचे जेवण करण्या करीता ते कळंबोली येथे १०-४५ वाजता येत असता कळंबोली येथील आत्माराम पाटील चौक येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची नवरात्री निमित्त वर्दळ होती. अच ानक त्यांच्या गाडीपुढे एक पिशवी त्यांना दिसली. सदर पिशवी वरून अनेक गाड्या गेल्या होत्या. सदर पिशवी पोलीस नाईक सुधाकर पाटील यांनी उचलुन आपल्या ताब्यात घेऊन ते निवासस्थानी जेवण करण्याकरीता मार्गस्थ झाले घरी जाऊन पिशवी तशीच टेबलवर ठेवुन ते जेवण आटपुन पुन्हा खांदा कॉलनी येथे वरीष्ठांच्या आदेशानुसार पेट्रोलींग करीता आले. रात्री घरी पुन्हा येण्यास उशीर झाल्याने दमलेले सुधाकर पाटील यांचा डोळा कधी लागला याची त्यांना ही कल्पना आली नाही. त्यामुळे मिळालेल्या पिशवीत काय आहे व ती कोणाची आहे हे झोपेमुळे ते विसरून गेले सकाळी उठल्यावर त्याच्या लक्षात आले की सदर पिशवीत काय आहे हे पहावे !त्यानंतर त्यांनी पिशवी उघडताच त्यांना आश्चर्य वाटले पहातो तो काय त्यात दोन सोन्याच्या लखलखत्या नव्या चैन होत्या व त्यावर कळंबोली येथील सोनार माँ मनसा ज्वेलर्स व मोबाईल नंबर होता क्षणाचाही विलंब न लावता पाटील यांनी आपली इमानदारी दाखवुन देत सदर सोनाराची शहानिशा करून त्वरीत सोन्याची पेढी गाठली व तेथील मालक विश्वजीत मन्ना यांची भेट घेऊन खात्री कली असता ज्वेलर्स मालक यांनी सदर दोन्ही चेन २८, ग्रॅम ७५५ मिली अंदाजे रक्कम १ लाख ४५ हजार रूपयाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही चेन ह्या प्रदीप पिल्ले रा. कळंबोली निल संकुल बिल्डींग यांनी दसरा असल्याने आधीच एक दिवस मुर्तीकरीता खरेदी माझ्याकडुन केल्या असल्याचे सांगितले पो. नाईक सुधाकर पाटील याची ईमानदारी पाहून ज्वेलर्स मालकाने चक्क २ कीलो पेढे आणून पाटील यांच्याकडे देऊन त्यांचा तेथेच सत्कार केला. याच दरम्यान आपल्या हातुन दागिन्याची पिशवी हरविल्याची तक्रार प्रदीप पिल्ले रा. कळंबोली यांनी कळबोली पोलीस ठाण्यात फीर्याद दिली होती त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करणार होते. परंतु पो. नाईया सुधाकर पाटील यांच्यासारख्या ईमानदार पोलीसाने ह्या तपासास पुर्णविरामच दिल्याचे कळंबोली वासियांत बोलले जात आहे अशा ईमानदार पो. ना. सुधाकर पाटील याचा कळबोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते सत्काराचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते सत्काराचे आयोजनही केले गेले.
फोटो : कळंबोली वरीष्ठ पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांच्या समक्ष प्रदीप पिल्ले कुटुंबियांचे लाखोचे दागिने सुपूर्द करताना ईमानदार पोलीस नाईक सुधाकर पाटील
Comments