कळंबोली पोलीस आयोजित भव्य रक्तदान शिबिरात प्रभुदास भोईर यांनी केले शेकडो कार्यकर्त्यांसह रक्तदान...
प्रभुदास भोईर यांनी चेतवला रक्तदानाचा महायज्ञ


कळंबोली - प्रतिनिधी

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत कळंबोली पोलीस ठाणे यांच्यातर्फे कळंबोली येथील सुधागड हायस्कूल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ८ व ९ ऑक्टोंबर रोजी हे शिबिर संपन्न होत आहे. या भव्य रक्तदान शिबिरात आज महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास अर्जुन भोईर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह सहभागी होऊन रक्तदान केले. सुमारे ५५० पुरूष व महीला रक्तदात्यांनी यावेळी रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले.

या रक्तदान शिबिरास भेट देण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह परिमंडळ दोनशे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील उपस्थित होते.

यावेळी रक्तदान शिबीरासोबतचं नागरीकांची रक्तगट तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी देखील करण्यात आली.

प्रभुदास भोईर यांची रक्तदान शिबिरात ग्रँड इंट्री ‌                                      या शिबिरास सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर हे आपल्या शेकडो समर्थकांसह वाजत गाजत ढोल ताशांच्या नगारात कळंबोली शहरातून मिरवणूक काढीत सहभागी झाले. त्यांची ही ग्रँड एन्ट्री पाहून उपस्थित नागरिक अचंबित झाले होते.

कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी अतिशय भव्य प्रमाणात या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या रक्तदान शिबिरात पोलीस कर्मचाऱ्यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच समाजातील प्रत्येक थरातील व्यक्ती सहभागी होताना दिसत आहेत. या दोन दिवसात या ठिकाणी हजारो बाटल्या रक्त जमा होईल आणि ते रक्त गरजवंताला दिले जाईल याचा मला विश्वास वाटतो ‌                        ‌         - बिपिन कुमार सिंग, पोलीस आयुक्त नवी मुंबई

आजचा हा रक्तदानाचा महायज्ञ म्हणजेच महाउत्सव आहे आणि कळंबोली पोलीस ठाण्यात तर्फे समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना या रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आव्हानाला अतिशय मोठा प्रतिसाद लाभला आहे. कळंबोली शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी बांधव, कामगार बांधव, त्याचप्रमाणे या ठिकाणी वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आलेले महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांचे मी आभार मानतो.     ‌                       ‌- संजय पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक कळंबोली 

मी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांचे आभार मानतो कारण त्यांनी अशा प्रकारे भव्य प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्यांनी आवाहन केल्यानुसार मी माझ्या शेकडो कार्यकर्त्यांचा या ठिकाणी रक्तदानासाठी आलो आणि आपले रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून प्रत्येक नागरिकांनी हे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून रक्तदान करायलाच हवे.‌                ‌ - प्रभुदास भोईर महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटना अध्यक्ष
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image