कै.विठ्ठल चाहु केणी मैदानाच्या नामफलकाचे अनावरण ; चार गावांना मिळाले हक्काचे खेळाचे मैदान..

चिंचपाडा गाव ग्रामस्थांचा पुढाकार...

पनवेल / प्रतिनिधी -- चिंचपाडा, कोपर, कोल्ही, वाघिवली वाडा या गावांचे नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी स्थलांतर करण्यात आले. यावेळी या गावांना हक्काचे मैदान मिळावे यासाठी ग्रामस्थांचा सातत्याने सिडकोकडे पाठपुरावा सुरु होता. मात्र सिडकोने चिंचपाडा विठ्ठलवाडी समोरील मैदान देण्यात आले आहे. या मैदानाला चिंचपाडा गावाचे सामाजिक कार्यकर्ते कै.विठ्ठल चाहु केणी (व्ही.सी) यांचे नाव देत या नावाच्या नामफलकाचे अनावरण मंगळवारी दिनांक 26 रोजी सकाळी जेष्ठ माजी क्रिकेट खेळाडू सुरेश महादेव केणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चिंचपाडा ग्रामस्थ व युवा तरुण, क्रिकेट पट्टू मोठ्या संख्येने उपस्तित होते.

राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील 10 गावांतील जमिनींचे संपादन करून विकसित करण्यात येत आहे. त्याचबरोबर चिंचपाडा, कोपर, कोल्ही, वाघिवली वाडा या प्रकल्पबाधित गावांतील ग्रामस्थांचे स्थलांतर येथील पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्रात करण्यात आले आहे. मात्र पूर्वी गाव होते व गावाबाजूलाच मैदान असल्याने त्या मैदानामध्ये खेळण्यासाठी जागा होती. मात्र आता पुनर्वसन झाल्यानंतर खेळ खेळण्यासाठी मैदानाची उणिवा तरुणांना व ग्रामस्थांना भासत होती. यावेळी येथील ग्रामस्थांनी सिडकोकडे आम्हाला खेळण्यासाठी मैदानाची आवश्यकता असल्याने लवकरात लवकर मैदान मिळावे यासाठी येथील ग्रामस्थांनी सिडकोकडे पाठपुरावा सुरु होता. अखेर चिंचपाडा विठ्ठलवाडी समोर सिडकोने खेळाचे मैदान आरक्षित केले. त्यानुसार त्या मैदानाचे कामही प्रगतीपथावर आहे. यावेळी चिंचपाडा ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गावातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे कै.विठ्ठल चाहु केणी (व्ही.सी) यांचे नाव या मैदानाला द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार मंगळवारी दिनांक 26 रोजी सकाळी चिंचपाडा ग्रामस्थ विठ्ठलवाडी समोरील मैदानाच्या प्रवेशद्वारावर कै.विठ्ठल चाहु केणी (व्ही.सी) मैदान नामफलकाचे अनावरण चिंचपाडा गावातील प्रतिष्ठित जेष्ठ माजी क्रिकेट खेळाडूं सुरेश महादेव केणी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी चिंचपाडा गावातील जेष्ठ नागरिक, माजी खेळाडू, युवा खेळाडू त्याचबरोबर ग्रामस्थ उपस्तित होते.
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image