ओरियन मॉल मध्ये आयएनएस विक्रांतची प्रतिकृती...
ओरियन मॉल मध्ये आयएनएस विक्रांतची प्रतिकृती... 
विक्रांतला पाहण्यासाठी पनवेलकरांची गर्दी .. 


पनवेल / दि.१६ (संजय कदम) : भारतभरात यावर्षी अमृत महोत्सवी वर्ष साजरा होत आहे. देशात प्रथमच घरोघरी तिरंगा झेंडा फडकला.यामुळे यावर्षीची दिवाळी देखील विशेष असुन लोकांच्या मनामनात राष्ट्र भक्तीची ज्योत चेतवण्यासाठी पनवेल शहरात ओरियन मॉल मध्ये आयएनएस विक्रांतची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या प्रतिकृतीचे उदघाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पार पडले.        
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवी मुंबई व रायगड विभागातील महाव्यवस्थापक अपर्णा जोगळेकर, ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, निवृत्त नेव्हल ऑफिसर कंमाडर जसबीर सिंग, संस्कार भारतीचे डॉ.शैलेश भेंडे, प्रतिकृती साकारणारे सिद्धार्थ साठे, मा.सभागृहनेते परेश ठाकूर, ऍड.अमित चव्हाण, विजय काळे, मा.नगरसेविका दर्शना भोईर, मा.नगरसेवक तेजस कांडपिळे, ओरियन मॉलचे डायरेक्टर मनन परुळेकर, राजेश गायकर, मयुरेश नेतकर आदींसह मोठ्या संख्येने पनवेलकर उपस्थित होते. भारताच्या ऐतिहासिक युद्धात आयएनएस विक्रांतची महत्वाची भूमिका राहिली आहे. भारताची पहिली युद्धनौका म्हणुन ओळख असलेल्या या युद्धनौकेच्या चलचित्रांचे प्रदर्शन देखील ओरियन मॉल मध्ये भरविण्यात आले आहे. संस्कार भारती, ओरियन मॉल आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून संपुर्ण दिवाळीमध्ये हे प्रदर्शन पनवेलकराना पाहता येणार आहे. “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चला...दिपावलीचा आनंद द्विगुणित  करुया, मनामनातील दिप उजळुया राष्ट्र भक्तीची ज्योत चेतवूया” या घोषवाक्याचा आधारे आयएनएसची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. पनवेलकरांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर व मनन परुळेकर यांनी केले आहे.

कोट - पनवेलकरांसाठी ऐन दिवाळीमध्ये ओरियन मॉलमध्ये आयएनएस विक्रांतची प्रतिकृती हि चांगली भेट आहे. अनेकवेळा आपण प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन पाहू शकत नाही. परंतु आज या प्रतिकृतीतून तिची भव्यता व तिचा इतिहास नक्कीच डोळ्यासमोर तरळतो. - आ. प्रशांत ठाकूर      

बँक ऑफ महाराष्ट्राला हि एक चांगली संधी मिळाली आहे. या प्रतिकृतीला उभारण्यासाठी हातभार लावण्याचे सौभाग्य आम्हाला मिळाले आहे. आजच्या तरुण पिढीने मॉलमध्ये खरेदी करताना आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्यावी व यातून देशभक्तीचे स्फुरण घ्यावे. - अपर्णा जोगळेकर (महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र नवी मुंबई व रायगड विभाग)

आम्ही नेहमीच समाजाला चांगले देण्याचा प्रयत्न ओरियन मॉलच्या माध्यमातून करत असतो यावेळी सुद्धा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही ओरियन मॉलमध्ये आयएनएस विक्रांतची प्रतिकृती उभारली आहे. साधारण एक महिनाभर प्रतिकृती पनवेलकराना पाहता येणार आहे. त्यानंतर हि प्रतिकृती शाळेला भेट देण्यात येणार आहे. -  मंगेश परुळेकर (ओरियन मॉलचे मालक)

फोटो : आयएनएस विक्रांतची प्रतिकृतीचे उदघाटन व पाहणी करताना आ प्रशांत ठाकूर सह इतर मान्यवर.
Comments