धगधगती मशाल प्रत्येक शिवसैनिकांच्या हृदयात हिंदुत्वाचा, मराठी अस्मितेचा लढा कायम ठेवेल - रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील
रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील
पनवेल / दि.११ (संजय कदम) : आमचं चिन्ह जरी गोठवल गेलेलं असेल तरी आम्हाला मशाल ही निशाणी मिळाली आहे. आणि हीच धगधगती मशाल प्रत्येक शिवसैनिकांच्या हृदयात हिंदुत्वाचा, मराठी अस्मितेचा लढा कायम ठेवेल असा आत्मविश्वास शिवसेनेचे वाघ रायगडचा जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातील तळोजा फेज 1 येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे मुळ चिन्ह गोठवल्यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेला ‘मशाल’ हे चिन्ह दिले आहे. या चिन्हाबाबत रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनी मत नोंदवले असून आम्हाला मिळालेले चिन्ह हे धगधगती मशाल प्रत्येक शिवसैनिकांच्या हृदयात हिंदुत्वाचा, मराठी अस्मितेचा लढा कायम ठेवेल असा आत्मविश्वास बबनदादा पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना रायगड उपजिल्हाप्रमुख रामदास दादा पाटील, शिवसेना पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर, युवासेना रायगड जिल्हा समन्वयक नितीन पाटील, शिवसेना महानगरप्रमुख कैलास पाटील, तळोजा शहर प्रमुख मिथुन मढवी, युवासेना तळोजा शहर अधिकारी तेजेश अंकुश पाटील, युवासेना तळोजा शहर चिटणीस अभिमन्यू गोरे, शिवसैनिक विकास भोईर, तळोजा शिवसेना गटप्रमुख कुंदन मुंबईकर, शिवसैनिक विघ्नेश मुंबईकर, शिवसैनिक निर्भय पाटील, शिवसैनिक हरेश मुंबईकर, शिवसैनिक जगदीश मढवी, नावडे शाखाप्रमुख यशवंत खानावकर, देविचापाडा शाखाप्रमुख विलास पाटील, उपमहानगर प्रमुख लीलाधर भोईर, नावडे तळोजा शहरप्रमुख महेश भोईर, पेंधर शाखाप्रमुख उत्तम भोईर, कळंबोली शाखा प्रमुख रामादेवर मणी, नावडे तळोजा उपशहरप्रमुख देवेंद्र पाटील, अर्जुन गायकवाड, राजेश केणी, जयनंदन शर्मा, हरेश पाटील यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

फोटो : तळोजा फेज 1 येथे  मशाल पेटवून जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवताना
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image