भांडणाच्या रागातून पती झाला बेपत्ता..
भांडणाच्या रागातून पती झाला बेपत्ता..

पनवेल दि.7 (वार्ताहर) : पत्नी सोबत भांडण झाल्याने त्याचा राग मनात धरून पती कोठेतरी निघून गेल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात त्याच्या पत्नीने दिली आहे.
आकाश रंगराव आळाणे (वय ३५, राहणार शिरढोण) रंग सावळा, उंची ५ फूट ६ इंच, अंगाने मध्यम, चेहरा उभा, नाक सरळ, डोक्याचे केस काळे व मिशी बारीक, दाढी नाही असून अंगात हिरव्या रंगाचा शर्ट असून व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट तसेच पायात काळे बूट आहेत. 

या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस नाईक यु. बी. पाटील यांच्याशी संपर्क साधावा. 


फोटो : बेपत्ता आकाश आळाणे
Comments