गणेश विसर्जनाला लागला गालबोट; वडघर येथे ११ जणांना लागला विजेचा शॉक...
गणेश विसर्जनाला लागला गालबोट ; वडघर येथे ११ जणांना लागला विजेचा शॉक

पनवेल दि.१० (वार्ताहर) : राज्यात भक्तीमय वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात असतानाच गणेश विसर्जनाला गालबोट लागणारी धक्कादायक घटना पनवेलमधील वडघर येथे घडली आहे. विसर्जना दरम्यान शुक्रवारी सायंकाळी ८ च्या सुमारास ११ जणांना विजेचा शॉक लागला आहे. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णायलात दाखल करण्यात आले.
वडघर कोळीवाडा येथील विसर्जन घाटाजवळ गणेशभक्तांना विसर्जनासाठी पुरेसा उजेड मिळावा यासाठी जनरेटर लावण्यात आला होता मात्र मुसळधार पावसामुळे जनरेटरची वायर तुटली आणि विसर्जनासाठी आलेल्या मानस सुनील कुंभार (वय १७ ) या तरुणाच्या अंगावर पडली. हे पाहून त्याचे कुटुंबीय वाचवण्यासाठी आले असता त्यांनाही विजेचा शॉक बसला. यामध्ये सर्वम पनवेलकर (वय १५), तनिष्का प्रसाद पनवेलकर (वय ०९ महिने), दिलीप पनवेलकर (वय ६५), निहाल चोणकर (वय ५), दीपाली पनवेलकर (वय २४), वेदांत कुंभार (वय १९), दर्शना दयानंद शिवशिवकर (वय ३६),हर्षद दिलीप पनवेलकर (वय ३१), रितेश पनवेलकर (वय ३८), रुपाली पनवेलकर (वय ३५) यांना शॉक लागून ते जखमी झाल्याने त्यांना तातडीने पनवेल परिसरातील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आल. या दुर्घटनेची माहिती मिळताच माजी सभागृहनेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, परिमंडळ दोन चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्यासह पोलीस आणि महापालीकेच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत अपघातग्रस्तांना व त्यांच्या कुटुंबियांना मदत केली. या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात जेके डेकोरेटर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
फोटो : जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ करण्यात आले दाखल
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image