मंगलमूर्ती मित्र मंडळाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न...
मंगलमूर्ती मित्र मंडळाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

पनवेल दि.०३ (संजय कदम) : सार्वजानिक गणेशोत्सव काळामध्ये फक्त गणेशाची मूर्ती स्थापन करून गणेशोत्सव साजरा करण्यापेक्षा समाजासाठी उपयोगी पडेल असे कार्य करूया या उद्देशाने खारघर येथील सेक्टर १५ घरकुल मधील मंगलमूर्ती मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

मंगलमूर्ती मित्र मंडळाच्या वतीने यंदाही गणेशाची आकर्षक मूर्ती तसेच सुंदर असे परिसरात सजावट करण्यात आली आहे. 
तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून यावर्षी त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्याला परिसरातील तरुण वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


फोटो : मंगलमूर्ती मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर
Comments