अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांची ८९ वी जयंती रामदास शेवाळे प्रतिष्ठान तर्फे साजरी..
रामदास शेवाळे प्रतिष्ठान तर्फे साजरी..
 
पनवेल दि.२५  ( वार्ताहर) : अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, माथाडी कामगार नेते, मराठा आरक्षणासाठी पहिले बलिदान देणारे अण्णासाहेब पाटील यांची 89 जयंती कळंबोली येथे रामदास शेवाळे प्रतिष्ठान तर्फे साजरी करण्यात आली.
               कळंबोली बिमा नाका स्टील मार्केट या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी अण्णासाहेब पाटील  यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कष्टकरी गोरग़रीब जनतेला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आण्णासाहेब पाटील यांना अभिवादन करण्यासाठी शेकडो नागरिक व माथाडी कामगार उपस्थित होते. या वेळी भावूक झालेल्या माथाडी कामगारांनी आण्णासाहेब पाटील अमर रहे जा जयघोष केला. दरम्यान अनेक माथाडी कामगारानी आपली मनोगते व्यक्त केली. या वेळी रामदास शेवाळे प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीकांत फाळके, महेश गोडसे, एस डी हवालदार, सागर मोरे, निलेश दिसले, सागर मोरे,आमृत तरंगे, प्रकाश सपकाळ लहू मलकमिर, तानाजी जाधव, ज्ञानेश्वर गावडे, विठ्ठल शिंदे यांच्यासह शेकडो माथाडी कामगार उपस्थितीत होते.


फोटो - अण्णासाहेब पाटील यांची 89 जयंती
Comments