रोटरी खारघर मिड टाऊन तर्फे मुफ्त डोळे तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन..
रोटरी खारघर मिड टाऊन तर्फे मुफ्त डोळे तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन..
पनवेल, दि.२१(वार्ताहर)रोटरी खारघर मिड टाऊन व आर जे शंकरा हॉस्पिटल तर्फे वरवणे गावात मुफ्त डोळे तपासणी शिबिरच आयोजन करण्यात आले. या शिबिरात ११३ नागरिकांनी आपले डोळे तपासून घेतले. यात २२ लोकांना मोतीबिंदु चे आजार सापडले. या २२ लोकांना लगेच मोतीबिंदू चे मुफ्त ऑपरेशन साती शंकरा हॉस्पिटल ला नेण्यात आले. २८ लोकांना मुफ्त चष्म्याचे वाटप करण्यात आले.

तसेच I T M कॉलेज , खारघर तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात ११७ रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
रोटरी खारघर मिड टाऊन अश्या प्रकारचे उपक्रम गेल्या १६ वर्षापासून  सतत करत आहे असे रोटरी अध्यक्ष  प्रशांत कालन व प्रोजेक्ट डायरेक्टर अनुप गुप्ता यांनी सांगितले

फोटो- नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर
Comments