शिवसेना पदाधिकारी मेळावा खारघर मध्यवर्ती कार्यालयात संपन्न..
शिवसेना पदाधिकारी मेळावा खारघर मध्यवर्ती कार्यालयात संपन्न..

पनवेल वैभव / प्रतिनिधी : - दि. २८ ऑगस्ट २०२२ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना नेते तथा संपर्क नेते कोंकण विभाग सुभाषजी देसाई यांच्या सुचनेनुसार व मुंबईच्या मा.महापौर तथा रायगड जिल्हा संपर्क संघटिका सौ किशोरीताई पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड-पनवेल श्री. शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघ-१८८ मधील शिवसेना पदाधिकारी मेळावा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे पार पडला. 

मेळाव्यास मुंबईच्या मा.महापौर तथा रायगड जिल्हा संपर्क संघटिका सौ किशोरीताई पेडणेकर, संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, सहसंपर्क प्रमुख रघुनाथ (भाई) शिंदे, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उरण जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, निरीक्षक वैभव सावंत, रायगड जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, एकनाथ म्हात्रे, विश्वास पेटकर, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटिका सौ. कल्पनाताई पाटील, विधानसभा संघटिका सौ. रेवतीताई सकपाळ, तालुका संघटिका सौ. अनीता डांगरकर, सौ. मेघा दमडे, युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, विधानसभा अधिकारी पराग मोहिते तसेच सर्व उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गट प्रमुख, बूथ प्रमुख आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Popular posts
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा ; सभापतीपदी नारायणशेठ घरत तर उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड....
Image
पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत दिमाखदार यश..
Image
पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत सुयश..
Image
हार्ट अटॅक प्रसंगी उपयुक्त ठरणाऱ्या AED मशिन चे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व न्यू पनवेल च्या मार्फत लोकार्पण.....
Image
आगामी काळात उद्धव ठाकरेंना जनता उत्स्फूर्त पाठिंबा देईल - शेकाप राज्य सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील
Image