चाकूच्या धाकाने गुगल पे द्वारे ट्रक चालकाला ९२ हजाराला लुटले...
चाकूच्या धाकाने गुगल पे द्वारे ट्रक चालकाला ९२ हजाराला लुटले...


पनवेल दि.२५ (वार्ताहर) : अज्ञात त्रिकुटाने ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून मोबाईलचा पासवर्ड घेऊन त्याच्या मोबाईलमधून ९२ हजारांची रक्कम गुगल पेद्वारे स्वतःच्या खात्यात वळती करून घेऊन पलायन केल्याची घटना नुकतीच कळंबोली येथे घडली. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणातील त्रिकुटाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
तक्रारदार त्रिभुवन यादव (४५) हा कळंबोली सेक्टर- २० मध्ये रोडपाली भागात राहतात. यादव कळंबोली स्टेशनसमोरील रोडच्या कडेला आपला ट्रक उभा करून त्यात तो झोपी गेला होता. पहाटे पावणेपाचच्या सुमारास त्या ठिकाणी एका मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात त्रिकुटातील एका लुटारूने त्रिभुवनला चाकूचा धाक दाखवून त्याला त्याच्या खिशातील मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर त्याने जबरदस्तीने मोबाईल फोनचा पासवर्ड घेऊन त्याच्या गुगल पेच्या खात्यातून ९२ हजारांची रोख रक्कम दुसऱ्या खात्यात वळती केली.
Comments