पनवेल शिवसेना शहर शाखेतर्फे पोस्ट ऑफिसच्या अपघाती विमा योजना मार्गदर्शन विशेष कार्यक्रम संपन्न ...

६५ जणांनी घेतला लाभ... 
पनवेल वैभव दि.१५ (संजय कदम): पनवेल शिवसेना शहर शाखेतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिव सहाय्य पनवेलच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज   अपघाती विमा योजना मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्याचा  ६५ जणांनी लाभ  घेतला.  
             शिवसेनेचे 80% समाजकारण आणि 20% राजकारण अंतर्गत भारतीय टपाल  (पोस्ट ऑफीस) सेवेची 399 रुपयांची अपघाती विमा योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने सदर मार्गदर्शन विशेष कार्यक्रमाचे आयोजन आज पनवेल शिवसेना शाखेत करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख  बबन दादा पाटील, रामदास पाटील उपजिल्हा प्रमुख, एकनाथ म्हात्रे महानगर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, दिपक निकम ,  विधानसभा संघटक,  शिरीष बुटाला जिल्हा सल्लागार . योगेश तांडेल तालुका संपर्क प्रमुख,  विश्वास पेटकर तालुका प्रमुख, प्रवीण जाधव शहरप्रमुख, शैलेश जगनाडे उपशहर प्रमुख, राहुल गोगटे. अच्युत मनोरे, अर्चना कुलकर्णी महिला संघटक,  दिलीप भोईर विभाग  संघटक,  किशोर सावंत शाखा प्रमुख,  राकेश टेमघरे, संकेत बुटाला,  डॉ गौरव दवे,  कुणाल कुरघोडे, अलंकार महाजन, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, खांदा वसाहत शहर प्रमुख सदानंद शिर्के,   विश्वास म्हात्रे. भास्कर पाटील, किरण तावदरे, चंद्रकांत शिर्के शाखा प्रमुख, यांच्यासह  पोस्ट ऑफिस मधुन जनार्दन बने,  सुरज घेहलोत, धीरज गेहलोत हे उपस्थित राहिले होते. या योजनेचा  ६५ जणांनी लाभ  घेतला असल्याची माहिती शहर प्रमुख प्रविण जाधव यांनी दिली .
फोटो: शिवसेना शाखेत  मार्गदर्शन विशेष कार्यक्रम संपन्न
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image