घरोघरी तिरंगा मोहिमेत ३१ सामाजिक संस्थाचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
घरोघरी तिरंगा मोहिमेत ३१ सामाजिक संस्थाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल दि. १३ ,(वार्ताहर ) :  पनवेल महानगरपालिका स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त सामाजिक संस्था, जेष्ठ नागरिक संघ, वकील व व्यवसायिकांनी चर्चासत्रात सक्रिय सहभाग घेतला, सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱयांना भारतीय ध्वज वाटप केले व संस्थेच्या परिसरात जनजागृती करण्यासाठी माहितीपत्रक सुपूर्द केले. 
                               
सदर चर्चासत्राला विठ्ठल डाके , उपायुक्त - पनवेल महानगरपालिका यांनी सर्वांना मार्गदर्शन केले व ध्वज भेट स्वरूपात दिले .
सदर चर्चासत्रात ३१ संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला, जागृती महिला मंडळ, स्त्री शक्ती बचत गट कामोठे, रोटरी क्लब ऑफ कळंबोली, जेष्ठ नागरिक संघ कळंबोली, आशा हॉस्पिटल चे डॉक्टर, स्त्री शक्ती फौंडेशन, राम मंदिर सामाजिक मंडळ  व  पोलीस मित्र पनवेल व इतर सामाजिक संस्था तसेच सौ.विजया कदम व  प्रसाद हनुमंते यांनी मोलाचा सहकार्य केलं व कार्यक्रम यशस्वी केला.  

फोटो -  चर्चासत्र
Comments