आगामी गणपती व दिवाळी निमित्त पनवेल परिसरातील वाहतूक कोंडी सोडवा - तालुका प्रमुख विश्वास पेटकर ..
वाहतूक कोंडी सोडवा -  विश्वास पेटकर 


पनवेल दि.२६ (संजय कदम) : गौरी गणपती व दिपावलीच्या सणांना पनवेल परिसरात होणाऱ्या वाहतूक कोडीचे नियंत्रण नियोजन करा असे निवेदन शिवसेना तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना दिले आहे. 
उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुकाप्रमुख विश्वास पेटकर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांची भेट घेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मांडला व तातडीने त्यावर उपाययोजना करावी अशी मागणीही केली. यावेळी मा.शहर प्रमुख विजय शेटे, मा. सरपंच दिलीप पाटील, मा उपविभागप्रमुख हिरामणभोईर, शाखाप्रमुख काशीनाथ पाटील, आकाश पेटकर आदी उपस्थित होते.
फोटो : वपोनि विजय कादबाने यांना निवेदन देताना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, तालुका प्रमुख विश्वास पेटकर व इतर
Comments