राष्ट्रवादी काँगेसचा आमरण उपोषणाचा इशारा...
पनवेल / प्रतिनिधी : - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल शहर जिल्हा समितीच्यावतीने पनवेलमहानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध समस्यां संदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी तळोजा गाव व तळोजा फेस १ मधील विविध कामे त्यामध्ये प्रामुख्याने रस्ता, पाणी, वीज, आरोग्य सेवा आदी समस्या महापालिकेने पंधरा दिवसांत पूर्ण कराव्यात अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल अश्या प्रकारचे निवेदन पनवेल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पनवेल महापालिका आयुक्तांना देण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ शिवदास कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष अजिनाथ सावंत, जिल्हा उपाध्यक्ष दौलत शिंदे, युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद बागल, युवक कार्याध्यक्ष शेहबाज़ पटेल, खारघर शहराध्यक्ष बळीराम नेटके, कामोठे शहराध्यक्ष चंद्रकांत नवले, युवक जिल्हा उपाध्यक्ष रणजीत नरुटे, युवक जिल्हा उपाध्यक्ष राजू नलावड़े, महेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.