टॅक्सीचालकाने इसमास मारहाण करून डोळा केला निकामी..
टॅक्सीचालकाने इसमास मारहाण करून डोळा केला निकामी


पनवेल दि.२६ (वार्ताहर) : एका टॅक्सीचालकाने मनात राग धरून एक इसमास शिवीगाळ व हाता-चापाट्याने मारहाण करून तसेच त्या इसमाच्या उजव्या डोळ्यावर बुक्की मारून त्याचा डोळा निकामी केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 
मधुकर अवघडे (वय ६२), हे काळुंद्रे गावातील ओएनजीसी पेट्रोल पंपावरून गाडीत पेट्रोल भरून बाहेर पडत असताना एका काळ्या पिवळ्या टॅक्सची गाडी त्यांच्या गाडी पुढे आल्याने त्यांना पुढे जाण्यास जागा नसल्याने त्याने त्यांच्या दुचाकीला ब्रेक मारला असता त्यात त्यांचा तोल जाऊन ते गाडीसह खाली पडले यावेळी त्यांनी टॅक्सी चालकाला तुला दिसत नाही का ? तू गाडी कशी चालवतो असे बोलले असता त्याचा राग मनात राग धरून शिवीगाळ व हाता-चापाट्याने मारहाण केली तसे उजव्या डोळ्यावर बुक्की मारून त्याचा डोळा निकामी केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली.
Comments