योजनांच्या माहिती फलकाचे उद्घाटन...
पनवेल दि.०८(वार्ताहर): महसूल दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख तथा तहसीलदार विजय तळेकर यांच्या हस्ते संजय गांधी योजना अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनाच्या माहिती फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी संगायो नायब तहसीलदार विनोद लचके, महसूल नायब तहसीलदार राहुल सुर्यवंशी, एकनाथ नाईक, पुरवठा अधिकारी प्रदीप कांबळे, अव्वल कारकून सुभाष राठोड, अव्वल कारकून अर्चना घरत, संतोष पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सहाय्यक, कोतवाल, शिपाई हे या छोटेखानी कार्यक्रमास उपस्थित होते. या फलकामुळे कोणते कोणते कागद जोडायचे याबाबत अर्जदारांना त्रास होत होता, त्याचबरोबर तलाठी यांना सुद्धा वारंवार लाभार्थ्यांना माहिती द्यावी लागत होती, तो वेळ वाचेल व आता कमीत कमी माहिती द्यावी लागेल.
फोटो: माहिती फलकाचे उदघाटन