भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री नारायणबाबा प्री प्रायमरी शाळे तर्फे काढण्यात आली विद्यार्थ्यांची रॅली
पनवेल दि १५, ( संजय कदम ) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज पनवेल रेल्वे स्टेशन जवळील श्री नारायणबाबा प्री प्रायमरी शाळे तर्फे शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.
श्री नारायणबाबा आश्रम ते शहरातील शिवाजी चौक व पुन्हा आश्रम अशी ही रॅली ध्वहजारोहणानंतर काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचा सहभाग व उत्साह मोठा होता. या रॅली चे आयोजन वाईस चेअरमन राम थदानी, सचिव रामलाल चौधरी यांनी केले होते.
फोटो - विद्यार्थ्यांची काढण्यात आली रॅली