सात वाहनांचे काचा फोडून म्युझिक सिस्टमसह गाडीची चोरी ....
सात वाहनांचे काचा फोडून म्युझिक सिस्टमसह गाडीची चोरी 


पनवेल दि. २६ ( वार्ताहर ) : खारघर सेक्टर १२ आणि १८ मध्ये अज्ञात चोरट्यांनी वाहनांच्या काचा फोडून म्युझिक सिस्टीमची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या वेळी चोरट्यांनी रस्त्यावर उभी असलेली सात वाहने फोडली. तसेच गाडीही चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
खारघर परिसरात भाड्याने राहणाऱ्या वाहनमालकांना सोसायटीत पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. सोसायटीबाहेर वाहने उभ्या असलेल्या अशाच सात वाहनांच्या काचा एकाच वेळी फोडण्यात आल्या आहेत. चोरट्यांनी वाहनातील म्युझिक सिस्टीम आणि इतर काही वस्तू चोरून नेल्या आहेत. तसेच खारघरमधील भूमिका हेमंत वाडकर यांची घरासमोर उभी केलेली गाडीही चोरट्यांनी नेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल आहे.
Comments