विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग ..
पनवेल/प्रतिनिधी -- १३ ऑगस्ट पासून भारतात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असून विविध ठिकाण ही भारताच्या तिरंग्याच्या रंगात नाहून गेली आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त को.ए. सो.इंदुबाई आ.वाजेकर इंग्रजी माध्यम शाळा पनवेलमधील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पनवेलमध्ये रॅली काढली. यात अनेक शाळातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
यावेळी शाळा समिती अध्यक्ष व्ही.सी.म्हात्रे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मानसी कोकीळ, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनिषा पाटील सर्व विद्यार्थी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यात सहभागी झाले होते.